dev.dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करून मृतदेह घरात पुरला; वैजापूरच्या बळहेगाव येथील घटना : दोन दिवसांपासून होते बेपत्ता

वैजापूर :  धारदार शस्त्राने हत्या करून पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह पडक्या घरात जमिनीत पुरुन टाकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वैजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार, 4 जानेवारी रोजी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील बळहेगाव येथे उघडकीस आली. नानासाहेब रामजी दिवेकर (५२ वर्ष) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब दिवेकर हे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचे भाऊ व पुतण्या रविवारी शिऊर पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी नानासाहेबांच्या घराच्या भिंतीवर आणि सोफ्यावर रक्ताचे डाग असल्याचे सांगितले. या माहितीवरून शिऊरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब आणि त्यांच्या पथकाने तातडीने बळहेगाव येथे भेट दिली. परिसराची पाहणी करताना शेजारीच असलेल्या पत्र्याच्या पडक्या खोलीत खड्डा उकरल्याचे निदर्शनास आले. संशय बळावल्याने पोलिसांनी नायब तहसीलदार सूरज कुमावत यांच्या उपस्थितीत तो खड्डा उकरला असता, आत नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top